• Tue. Oct 14th, 2025

डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची नियुक्ती

ByMirror

Sep 22, 2025

विविध सामाजिक संघटनांकडून सत्कार


गायकवाड यांच्या कार्यातून आंबेडकरी चळवळीला एक सकरात्मक दिशा मिळणार -प्रकाश थोरात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समितीच्या (नवी दिल्ली) अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंद्रेश गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे व पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.


डॉ. आंबेडकर परिनिर्वाण भूमि सन्मान-कार्यक्रम समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अण्णासाहेब गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात, पिंपळगाव सोसायटीचे चेअरमन शंकरराव मुळे, प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते रामदास वाघ, सर्जेराव शिरसाठ, मराठा क्रांतीचे विजय भगत, विठ्ठल भिंगारदिवे, सुभाष आल्हाट, बौद्धाचार्य निलेश जाधव, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अनिल घाटविसावे, सलीमभाई शेख, मुन्नाभाई शेख, असीफ बेग, समीर शेख, मिलींद आंग्रे, संजय देवढे आदी उपस्थित होते.


शंकरराव मुळे यांनी त्यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील सामाजिक व आंबेडकरी चळवळ अधिक बळकट होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. प्रकाश थोरात यांनी गायकवाड यांच्या कार्यातून आंबेडकरी चळवळीला एक सकरात्मक दिशा मिळणार आहे. तसेच युवकांचे संघटन होऊन सामाजिक कार्याला ऊर्जा मिळणार असल्याचे ते म्हणाले.


गायकवाड यांचे समाजकारणात सुरु असलेले कार्य, एकनिष्ठपणे आंबेडकरी चळवळीत देत असलेले योगदान आणि बाबासाहेबांच्या विचाराने सुरु असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांनी आंबेडकरी चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच संघटन करुन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *