आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करुन सत्कार
युवाशक्तीच्या सहभागातून समाजपरिवर्तन शक्य -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सक्षम राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सक्षम जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, अभिजित खोसे, युवराज शिंदे, प्रा. माणिकराव विधाते, पै. ओंकार घोलप, पै. तुषार अरुण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, समाज बदलासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. युवकांनी राजकारणासोबतच समाजकारणातही सक्रीय योगदान दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा कार्यकर्त्यांना समाजकारणात काम करण्याची मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी सांगितले की, आज युवक विकासाकडे अपेक्षेने पाहत आहेत. नगर जिल्ह्याचे बदलते शहरी रूप युवकांच्या डोळ्यांसमोर आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामुळे मोठा युवा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडला गेला आहे. समाजकारणाची तळमळ व कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात असल्याचे ते म्हणाले.
सक्षम जाधव यांच्या संघटन कौशल्याचा व युवकांमध्ये असलेल्या जनसंपर्काचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. युवकांमध्ये सक्रिय सहभाग, सामाजिक कार्य करण्याची ओढ आणि प्रामाणिक तळमळीने जाधव काम करत आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.