• Fri. Sep 19th, 2025

न्यूज टुडे 24 ला उत्कृष्ट युट्युब चॅनलचा मान

ByMirror

Sep 14, 2025

मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात चॅनेलचे संपादक आफताब शेख यांचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात न्यूज टुडे 24 या लोकप्रिय युट्युब चॅनलला उत्कृष्ट युट्युब चॅनल म्हणून घोषित करण्यात आले. त्याबद्दल चॅनलचे संपादक आफताब मन्सूर शेख यांचा माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. भागवत कराड तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, धनंजय लांबे, परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने लोकांच्या समस्यांना न्याय देणारे, भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे आणि शासन-प्रशासनातील त्रुटींवर प्रकाश टाकणारे न्यूज टुडे 24 हे चॅनल आज राज्यभरातील प्रेक्षकांचा विश्‍वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहे. 2 लाख 80 हजारांहून अधिक सबस्क्रायबर, 15 कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकवर्ग व 125 जिल्हा-स्तरीय रिपोर्टर्सच्या जाळ्यामुळे हे चॅनल डिजिटल माध्यमातील एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे.


न्यूज टुडे 24 चा प्रवास हा न्यायाचा आवाज, लोकांचा विश्‍वास या ध्येयवाक्याशी जोडलेला असून, सातव्या वर्षात पदार्पण करत असताना मिळालेला हा मानाचा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *