ओम बिस्लेरी पाणीपुरी सेंटरला भेट देऊन स्वच्छता व आस्वादाचे कौतुक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवानिमित्त शहरात आलेल्या स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सहकलाकार सुखदा बोरकर यांनी चाहत्यांसोबत एक वेगळीच भेट घेतली. नवीपेठ येथील ओम बिस्लेरी पाणीपुरी सेंटरला त्यांनी भेट देत नगरी चवीचा आस्वाद घेतला. स्वच्छता व चवीचा अनोखा संगम साधणाऱ्या या केंद्रावरील स्वादिष्ट व हायजेनिक पाणीपुरी, शेवपुरीची त्यांनी मनमोकळी प्रशंसा केली.
या प्रसंगी अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाल्या की, रस्त्यावर पाणीपुरी, चाट खाताना प्रत्येकाच्या मनात स्वच्छता व पाण्याच्या शुध्दतेची काळजी असते. मात्र ओम बिस्लेरी पाणीपुरीने नगरकरांच्या मनातील ही भीती दूर केली आहे. येथे बिस्लेरीचे शुध्द पाणी वापरले जाते. त्यामुळे खवय्ये निर्धास्तपणे आवडीचा आस्वाद घेऊ शकतात. स्वच्छता आणि स्वाद यांचा सुंदर मिलाफ येथे साधला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, निवेदक प्रसाद बेडेकर, सुहास कुलकर्णी, सचिव आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, प्रकाश गांधी, अमित गांधी, अजित गांधी, सत्येन मुथा आदी उपस्थित होते.
ललित बनभेरू, प्रतिक बनभेरू यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पाणीपुरी, दहीवडा व शेवपुरी दिली. प्रतिक बनभेरू म्हणाले, मूळच्या नगरच्या असलेल्या गौरी कुलकर्णी यांनी सिनेसृष्टीत मोठे नाव कमावले आहे. आज त्यांनी आमच्या पाणीपुरी, दहीवडा व शेवपुरीचे कौतुक करून हायजेनिक सेवा देण्याची प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सुखदा बोरकर यांना पाहण्यासाठी चाहत्या वर्गाने यावेळी मोठी गर्दी केली होती. तर युवती व महिलांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतल्या.