• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील राधाकृष्ण मंदिरात चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी

ByMirror

Aug 16, 2025
श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा

श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा


राधा-कृष्ण रासलीलेच्या जीवंत देखाव्याने भाविक मंत्रमुग्ध

नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिरात (ट्रस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. शुक्रवारी (दि.15 ऑगस्ट) मध्यरात्री 12 वाजता मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. तर शनिवारी दुपारी श्रीकृष्णच्या वेशभूषेत आलेल्या बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. हदीहंडी फुटताच हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की! च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या चिमुकल्या मुला-मुलींनी सर्वांचे लक्ष वेधले.


शुक्रवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात बबलू दुग्गल व त्यांच्या सहकलाकारांनी राधा-कृष्णवर एकाहून एक सरस भक्तीगीते सादर केली. भक्तीगीतांनी बहरलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी कृष्ण लीलाचे सादरीकरण करण्यात आले. कृष्ण व सुदामा भेट व राधा-कृष्ण रासलीलेचा जीवंत देखाव्याने भाविक मंत्रमग्ध झाले. याप्रसंगी शीख, पंजाबी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राधा-कृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले व विविध भक्तीगीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. राधा-कृष्णवर भक्तीगीतांनी बहरलेल्या कार्यक्रमात भाविकांनी देखील ठेका धरला होता. भजनाने वातावरण भक्तीमय बनले होते. गोविंद बोलो, हरि गोपाळ बोलो… भजन सादर करुन रात्री 12 वाजता मंदिरातील पाळणा हलविण्यात आला. सजवलेल्या पाळण्यात भगवान श्रीकृष्णची प्रतिमा ठेवण्यात आली होती. पाळणा हलवून श्रीकृष्णची आरती करण्यात आली. यावेळी शहरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.


शनिवारी मंदिरात श्री कृष्णाच्या वेभुषेत आलेले लहान चिमुकले कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. पावसाच्या संतधारेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्‍वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने सौ. वधवा व जग्गी यांचा सन्मान
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी गोवा ते हैदराबाद विमान प्रवासात 35 हजार फूट उंचीवर एका महिलेचे प्राण वाचवून जीवदान दिल्याबद्दल आणि 16 वर्षीय युवक तनिष्क जग्गी याने क्वांटम मेकॅनिक्स आणि जीवशास्त्र यांचा संगम घडवून जिवंत प्रणालींचे आकार व वर्तन हे क्वांटम अवस्थेतून विकसित होत असल्याचे केलेल्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याबद्दल त्यांचा पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *