• Sun. Feb 15th, 2026

सारसनगरच्या विधाते विद्यालयात रक्षाबंधन साजरा

ByMirror

Aug 9, 2025

विद्यार्थिनींनी बांधल्या आपल्या भावांना राख्या


विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व, स्नेह आणि संस्कारांची रुजवण

नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पारंपरिक पध्दतीने उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी शाळेतील मुलांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या. या उपक्रमातून शालेय परिसरात बहिण-भावाचा प्रेम दर्शविणारा आनंदमय सोहळा रंगला होता.


मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कारमूल्ये जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते यांनी उपस्थितांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना या सणामागील सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व सांगण्यात आले. रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नसून बंधुत्व, परस्पर सन्मान आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष सुसे, लता म्हस्के, सविता सोनवणे, राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, सचिन बर्डे, अमोल मेहत्रे, सारिका गायकवाड, निता जावळे, मिनाक्षी घोलप आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *