• Sun. Mar 1st, 2026

हरदिन मॉर्निंग ग्रुपने लोणावळ्याच्या सहलीत दिला स्वच्छतेचा संदेश

ByMirror

Aug 8, 2025

धार्मिक स्थळांना भेट देऊन राबविले स्वच्छता अभियान व पर्यावरण संवर्धनाची केली जागृती

नगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी लोणावळा येथील सहलीत धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन स्वच्छता अभियान राबविले. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असतानाच सदस्यांनी स्वच्छता हेच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचा संदेश दिला.


सहलीची सुरुवात भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात आरती करून झाली. त्यानंतर जॉगिंग पार्कमधील भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. लोणावळ्यातील श्री नारायण धाम येथे दर्शन घेऊन गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला. यानंतर परमपूज्य आचार्य मुनी सुव्रत स्वामी जैन देशसर जयानंद धाम येथे दर्शन घेतल्यानंतर भुशी डॅमच्या फेसाळणाऱ्या पावसाळी धबधब्यात पावसाचा मनसोक्त आनंद हरदिनच्या सदस्यांनी लुटला. शेवटी एकवीरा देवी मंदिर येथे दर्शन घेऊन सहल यशस्वीरीत्या नगर शहरात परतली.


संपूर्ण सहलीदरम्यान हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी धार्मिक स्थळांच्या परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली. मंदिरांच्या आवारातील कचरा उचलणे, पाण्याच्या नाल्यांजवळील प्लास्टिक काढून टाकणे, तसेच तीर्थक्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहित करणे या उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.


या सहली दरम्यान हरदिनच्या सदस्यांनी विविध धार्मिक स्थळाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, सचिनशेठ चोपडा, रतनशेठ मेहेत्रे, जहीर सय्यद, दिलीप गुगळे, मेजर दिलीप ठोकळ, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, सुधीरशेठ कपाळे, अविनाश जाधव, सचिन पेंढुरकर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, दीपक घोडके, प्रवीण भोसले, कुमार धतुरे, सुभाष पेंढुरकर, डॉ. अतुल मडावी, अविनाश पोतदार, प्रज्योत सागू, मच्छिंद्र बेरड, किरण फुलारी, दिनेश शहापूरकर, दत्तात्रय लाहुंडे, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, राजू कांबळे, शेषराव पालवे, इंजि. अनिलराव सोळसे, विलास दळवी, करण सोळसे, राजू शेख, जालिंदर अळकुटे आदी उपस्थित होते.


हरदिन मॉर्निंग ग्रुपने गेली अनेक वर्षे आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली आहे. सकाळी व्यायाम, योगा, चालणे-जॉगिंग कार्यक्रमांसोबतच वृक्षारोपण, रक्तदान, सार्वजनिक स्वच्छता, आणि प्लास्टिकमुक्ती यांसारख्या मोहिमा ते सातत्याने राबवत आहेत. स्वच्छता ही केवळ सौंदर्यासाठी नसून आरोग्यासाठी अनिवार्य आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली तर अनेक आजारांना आळा बसू शकणार असल्याची भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली.


सहल यशस्वी करण्यासाठी नवनाथ वेताळ, अनिल हळगावकर, दशरथ मुंडे, सुहास देवराईकर, योगेश चौधरी, शशिकांत पवार, कोंडीराम वाघस्कर, भरत कनोजिया, सुरेश देवकर, सिद्धू (तात्या) बेरड, सुनील बग्गन, अंबादास पालवे, एकनाथ कुलकर्णी, गीताराम उरमुडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *