• Wed. Mar 11th, 2026

रविवारी होणार गणराज प्रकाशनच्या ओंजळीतले सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ByMirror

Aug 7, 2025

पोपटराव गवळी लिखित समाजातील विविध घटक व पैलूंचे वेद घेणारे हृदयस्पर्शी काव्यसंग्रह

नगर (प्रतिनिधी)- समाजाच्या विविध घटक व पैलूंचे वेद घेणारे हृदयस्पर्शी गणराज प्रकाशन प्रकाशित आणि पोपटराव गवळी लिखित ओंजळीतले सुख या काव्यसंग्रहाचे रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.


छत्रपती संभाजी नगर रोड येथील डीएसपी चौक येथील हॉटेल पंचवटीका येथे हा प्रकाशन सोहळा म.सा.प.चे (पुणे) केंद्रीय सदस्य चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार लहू कानडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, कवियत्री तथा साहित्यिका प्रतिभा खैरनार, सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूतजालिंदर बोरुडे उपस्थित राहणार असल्याची माहिती गणराज प्रकाशन प्रा. गणेश भगत यांनी दिली.


ओंजळीतले सुख या काव्य संग्रहात लेखक पोपटराव गवळी यांनी सामाजिक, कौटुंबिक, प्रेम आणि ग्रामीण भागातील भावना आपल्या काव्यातून शब्दबध्द केले आहे. या सोहळ्यासाठी साहित्य प्रेमी व कवींना यांना उपस्थित राहण्याचे आवाहन इंजि. गणेश गवळी, डॉ. अबोली निकम, इंजि. राजहंस देसाई, इंजि. गौरी शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *