• Tue. Oct 14th, 2025

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीसाठी चौथऱ्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन

ByMirror

Jul 28, 2025

स्त्री शिक्षणाचे प्रतीक म्हणून अहिल्यानगर मधील फुले दांम्पत्यांचा पुतळा महाराष्ट्रात ओळखला जाणार -ना. अजित पवार

नगर (प्रतिनिधी)- सर्व समाजातील जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणे ही महायुती सरकारची भूमिका असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी मार्गक्रमण सुरू आहे. देशात सामाजिक समतेचा लढा देण्याचे व स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे फुले दांम्पत्यांचा पूर्णकृती पुतळा भावी पिढीसाठी प्रेरक ठरणार आहे. प्रगत महाराष्ट्र व विकसित देशाचा पाया फुले दांम्पत्यांमुळे रचला गेला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, त्यांचा आदर्श पुढे पिढ्यानपिढ्या मिळत रहावे या उद्देशाने आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने हा पुतळा उभारला जात आहे. स्त्री शिक्षणाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात हा पुतळा ओळखला जाणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले.


शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीसाठी चौथऱ्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि.27 जुलै) संध्याकाळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते झाले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मनपाचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी आयुक्त पंकज जावळे, प्रांत सुधीर पाटील, अशोक सावंत, आयएस अधिकारी नितेश भिंगारदिवे, अक्षय कर्डिले, सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीचे अध्यक्ष प्रा.माणिक विधाते, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, विश्‍वस्त ज्ञानेश्‍वर रासकर, पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, अनिल शिंदे, सचिन जाधव, अनिल मोहिते, बाजार समितीचे संचालक संतोष म्हस्के, माजी नगरसेवक संपत बारस्कर, निखिल वारे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, शरद झोडगे, अरुण कडू पाटील, अविनाश घुले, गणेश कवडे, भैय्या गंधे, सुनील रामदासी, अजिंक्य बोरकर, सुवेंद्र गांधी, संजय चोपडा, अरविंद शिंदे, ज्ञानदेव पांडुळे, प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, भगवान काटे, जालिंदर बोरुडे, मनीष साठे, जालिंदर कोतकर, सुनील मामा कोतकर, सतीश बारस्कर, आसाराम कावरे, बाळासाहेब पवार, सुरेश आंबेकर, सुनील त्र्यंबके, माऊली मामा गायकवाड, बाबासाहेब सानप, दिलीप झिपुर्डे आदी उपस्थित होते.


पुढे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, या पुतळ्याचे उत्तम काम होत असल्याचे समाधान आहे. फुले दांम्पत्यांचा पूर्णकृती पुतळ्याचे भूमीपूजन होत असताना घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्याचे उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. महापुरुषांचे पूर्ण कृती पुतळे अशी भावना संग्राम जगताप त्याचप्रमाणे घटक पक्षांची आहे. शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा उभारणीसाठीचा मनोदय व्यक्त करण्यात आला. त्याची जागा देखील निवडली गेली आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. याचे सर्व श्रेय महास्त्रियांना जाते. यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. फुले दांपत्यांच्या हाल, आपेष्टा व त्यांचा त्याग कोणीही नाकारू व विसरू शकत नाही. महायुती सरकारने महापुरुष व महास्त्रीयांचे भव्य-दिव्य पुतळे, स्मारक उभारण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह सर्व पाहुण्यांनी श्री विशाल गणपती मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन नियोजित महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळा उभारणीसाठी चौथाऱ्याच्या कामाचे भूमीपूजन पार पडले.


प्रास्ताविकात प्रामाणिक विधाते यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ही वास्तविक स्व. अरुणकाका जगताप यांची संकल्पना असल्याचे स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी माजी पाणीपुरवठा सभापती सुनंदाताई भुजबळ, सरपंच प्रयागाताई लोंढे, रेणुका पुंड, कल्याणी गाडळकर, बेबीताई गायकवाड, रोहिणी बनकर, सुषमा पडोळे, अरुणा गोयल, रेश्‍मा आठरे, लतिका पवार, सकल माळी समाजाचे संजय गारुडकर, डॉ.रणजीत सत्रे, अनिल इवळे, विनोद पुंड, कॅप्टन सुधीर पुंड, चंद्रकांत पुंड, प्रकाश इवळे, डॉ. केतन गोरे, मच्छिंद्र बनकर, भरत गारुडकर, ॲड. राहुल रासकर, राजेंद्र एकाडे, मळू गाडळकर, ब्रिजेश ताठे, संतोष हजारे, दत्ता गाडळकर, बजरंग भुतारे, विष्णू म्हस्के, नितीन डागवाले, बाळासाहेब आगरकर, नारायण इवळे, बाळासाहेब गायकवाड, साहेबराव विधाते, शिवाजी विधाते, सारंग पंधाडे, फिरोज खान, अभिजीत कांबळे, रमेश चिपाडे, शरद दातरंगे, अशोक आगरकर, माळी महासंघाचे मनोज भुजबळ, नंदू नेमाने, मनोज फुलसौंदर, विवेक फुलसौंदर, रामदास फुले, बाबासाहेब दळवी, पोपट शिंदे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय साबळे यांनी केले. आभार अशोक कानडे यांनी मानले.



या पूर्णाकृती पुतळ्यात महात्मा फुले यांचा 10 फुटी व सावित्रीबाई फुले यांचा 9 फुटी पुतळा राहणार आहे. लहान मुलगी शाळेत जाताना 4 फुटी पुतळा असून, हे तिन्ही पुतळे कास्य धातूपासून बनवले जाणार आहे. 1800 किलोग्राम वजनाचे हे पुतळे असणार आहेत. या सुशोभीकरणात भिडे वाड्यातील 5 प्रेरणादायी भिंती चित्र देखील निर्माण केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *