सर्व शाळांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधन निमित्त शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी निशुल्क चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या चॉकलेट कंपनीच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून, यामध्ये शाळांनी नोंदणी करुन सहभाग नोंदविण्याचे आवाहन कंपनीचे डायरेक्टर सुप्रिया चौधरी, प्रविण साळवे व सारिका शेलार यांनी केले आहे.
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. लहान (इयत्ता पहिली ते चौथी), मोठा (इयत्ता पाचवी ते सातवी) व वरिष्ठ (इयत्ता आठवी ते दहावी) या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. लहान गटासाठी रंग भरणे आणि इतर गटांसाठी रक्षाबंधन हा विषय देण्यात आलेला आहे.
शाळेने केलेल्या नोंदणीनंतर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना या चित्रकला स्पर्धेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. सर्वांसाठी प्रवेश निशुल्क राहणार असून भावा बहिणीच्या नात्यांमध्ये ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने चॉकलेटच्या माध्यमातून रक्षाबंधन निमित्त गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, नोंदणीनंतर स्पर्धेची तारीख जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रमाणपत्र व चॉकलेट गिफ्ट हॅम्पर बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9021066491, 8459575753 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.