अहमदनगर (प्रतिनिधी)- नवदांम्पत्यांनी शेताच्या बांधावर वट पौर्णिमेनिमित्त वडांची रोपे व फळझाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथे प्रविण येवले व अक्षदा येवले या दांम्पत्यांनी वट पौर्णिमेला वृक्षरोपण अभियान राबविला. डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या पर्यावरणावर सुरु असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन नवदांम्पत्यांनी हा उपक्रम राबविला.