• Tue. Jul 1st, 2025

दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Jun 28, 2025

जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनचा उपक्रम


वारकरी श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक -डॉ. संतोष गिऱ्हे

नगर (प्रतिनिधी)- वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या राहुरी-पंढरपूर पायी दिंडीचे नगर शहरात आगमन झाले. यानिमित्ताने जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवक कल्याण योजनेअंतर्गत आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल 245 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमात डॉक्टरांनी प्रत्येक वारकऱ्याची तपासणी करून गरजेनुसार औषधे दिली, तसेच सर्व वारकऱ्यांना फळवाटपही करण्यात आले.


शहरातील कोंबडी मळा, सोलापूर चौक परिसरात हे शिबिर पार पडले. दिंडीतील मुख्य प्रवर्तक राम महाराज यांचा सत्कार करून गौरवण्यात आले. याप्रसंगी उमंग फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, सचिव वैशाली कुलकर्णी, राष्ट्रीय मनावधिकार हक्कच्या सचिव कविता भिंगारदिवे, नयना बनकर, काळजापार बहुउद्देशीय संस्थेचे कविता बाळासाहेब नेटके, बाळासाहेब नेटके, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. महेश शिंदे, महेंद्र गिऱ्हे, पास्टर वाघमारे आदी उपस्थित होते.


कविता भिंगारदिवे म्हणाले की, वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख आहे. पंढरीकडे निघालेल्या या वारकऱ्यांचा आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारे वारकरी केवळ श्रद्धेने नव्हे तर शारीरिक व मानसिक ताकदीनेही सुसज्ज असावेत, यासाठी या प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. संतोष गिऱ्हे यांनी वारकरी समाज हा आपल्या श्रद्धा, सेवाभाव आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असून, या भावनेने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरास संजीवनी आर्थो ॲण्ड स्पाईन सेंटरचे विशेष सहकार्य लाभले. उमंग फाऊंडेशनचे डॉ. संतोष गिऱ्हे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *