जिल्हाधिकारी यांनी केली नियुक्ती
नगर (प्रतिनिधी)- दिव्यांगासाठीच्या राज्य सल्लागार मंडळाच्या जिल्हास्तरीय समितीवर ॲड. लक्ष्मण पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व पुनर्वसनाचे कार्य केले जाणार आहे.
दिव्यांगाच्या कल्याणासाठी निर्धारित केलेल्या 5% निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे व दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी योजनेची कार्यक्रमाची अंमलबजावणी व दिव्यांगाच्या अधिनियमातील तरतुदीची जिल्हा प्रशासनाद्वारे अंमलबजावणी योग्य होते की नाही? यावर समिती लक्ष ठेवून दिव्यांगाच्या विकासासाठी काम करत आहे. सदर समितीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी ही जिल्हा अपंग पुनर्वसन समितीवर व भारत सरकारच्या रेल्वे समितीवर देखील ॲड. पोकळे यांची नियुक्ती झालेली होती. या निवडीबद्दल शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, तसेच प्रहारचे पोपट शेळके, हमीद शेख, किशोर सूर्यवंशी, संजय पुंड, मधुकर धाडगे, सलीम शेख, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, ॲड. कारभारी गवळी यांनी पोकळे यांचे अभिनंदन केले.