गीते यांच्या माणुसकी व कर्तव्यदक्ष कार्याला केले सलाम
पोलीस यंत्रणा म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचा तिसरा डोळा -ॲड. अनुराधा येवले
नगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणारे आणि अपघात दाखवून कटकारस्थान रचून झालेला खून प्रकरण उजेडात आणणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा महिला वकीलांनी सन्मान केला.
महिला बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा येवले यांनी गीते यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक अनंत कोकरे, जगदीश मुंगीर, समीर बारवकर यांच्यासह ॲड. आरती पोखरणा, ॲड. योगिता कोकरे, ॲड. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.
ॲड. अनुराधा येवले म्हणाल्या की, पोलीस यंत्रणा म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचा तिसरा डोळा आहे. समाजातील दृष्ट प्रवृत्तींना अळा घालण्याचे काम पोलीस यंत्रणेतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे होत आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी अपघात झाला असल्याचा बनाव करण्यात आलेल्या घटनेचा योग्य तपास लावून तो खून असल्याचे प्रकरण उघडकीस आनले. त्यामुळे सदर युवकासह त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला. या प्रकरणात गीते यांचा तपास महत्त्वाचा ठरला. नुकतेच पुराच्या पाण्यात वाहून चाललेल्या नागरिकांचे जीव त्यांनी वाचवले. ते कर्तव्यदक्ष अधिकारी असले तरी, वर्दीमधील माणुसकी जपणारा अधिकारी असल्याचे, त्या म्हणाल्या.