भारतीय आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा करणार प्रचार-प्रसार
नगर (प्रतिनिधी)- दुर्धर आजारांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या आयुर्वेदिक फूड सप्लिमेंटचा प्रचार-प्रसार करणारे विष्णू शिवाजी अवचार व सौ. सोनाली विष्णू अवचार यांची दुबईला अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते भारतीय आयुर्वेदिक फूड प्रॉडक्टचा प्रचार-प्रसार करणार आहेत.
रियांश मल्टिट्रेड कंपनीच्या वतीने अवचार दांम्पत्यांना सहा दिवसाठी अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक मधुकर जाधव व दत्ताजी मांडे यांनी दिली. विष्णूलक्ष्मी प्रसाद फाउंडेशन संचालीका सोनाली व विष्णू अवचर (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) या गेल्या 33 महिन्या पासून रियांश मल्टिट्रेड कंपनीच्या माध्यमातून 33 महिन्यात 60 हजारांपेक्षा अधिक गरजू लोकांना कंपनीचे आयुर्वेदिक फुड सप्लिमेंट उपलब्ध करुन दिले. या आयुर्वेदिक उत्पादन विविध आजारांवर नवसंजीवनी देणारे ठरले आहे. अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात 2 हजार पेक्षा अधिक युवक-युवती कार्यरत आहेत. रियांशचे अमृत ज्युस औषध म्हणून अनेकांना वरदान ठरत असून, या आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रचार-प्रसार देशाबाहेर सुरु करण्यात आले. या निवडीबद्दल अवचार दांम्पत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.