पालकांसाठी तज्ञांचा मोफत खुला संवाद
मोबाईल व्यसन, सायबर गुन्हेगारीपासून वाचवा मुलांना; तज्ज्ञ पालकांशी साधणार संवाद
नगर (प्रतिनिधी)- पाल्य आणि पालक यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध घट्ट होण्यासाठी शहरातील पास अकॅडेमीच्या वतीने पालकांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बदललेल्या सामाजिक परिस्थिती मुळे व सोशल मीडियाच्या अतीवापरामुळे पालकांना व विद्यार्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कौटुंबिक, सामाजिक व शालेय संगोपनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या कार्यशाळेत तज्ञांशी खुला संवाद आयोजित केला आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
सदर द ग्रोव्हिंग इयर हा कार्यक्रम रविवार दि. 15 जून 2025 रोजी संध्याकाळी 5: 30 वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात आचार-विचारात सकारात्मकता आणने, अभ्यासात रुची वाढवणे, अवधानाचे केंद्रीकरण करणे, आंतरक्रियेतून अध्ययन इत्यादी सकारात्मक विषयांवर व मुलांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलचे व्यसन, मुलांकडून पालक व शिक्षकांचा अवमान, विध्यार्थांची बेशिस्त, गैरवर्तन, न ऐकणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष, अंधानुकरण, खाद्य संस्कृतीतील बदल आदी विषयांवर तज्ञ थेट पालकांशी संवाद साधणार असून अनेक प्रश्नांची उकल करणार आहेत.
सायबर क्राईम, विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी या विषयांवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे समुपदेशन करणार आहेत. त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर अनेक प्रशिक्षण शिबीर घेतली आहेत. तसेच देशभरात 500 हून अधिक पोलिसांना भावनिक बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांच्या या अनुभवाचा पालकांना फायदा होणार आहे.
जीवन कौशल्ये, बालकांच्या संगोपनात पालकांची भूमिका या विषयांवर मानसशास्त्रीय तज्ञ नयना डीन्नी ह्या पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. नयना डीन्नी ह्या सुप्रसिद्ध जीवन प्रशिक्षक आणि मानासशात्रीय तज्ञ असून त्यांनी आत्तापर्यंत आपल्या भावना व आपली कर्तव्य या मध्ये सुसंवाद साधण्यासाठी 700 हून अधिक लोकांना प्रशिक्षण व समुपदेशन केलेले आहे. या प्रमाणित समुपदेशक असून यांचा पालकत्व यावर विशेष अभ्यास आहे.
शैक्षणिक समुपदेशक म्हणून प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर या देखील या संवादात तज्ञ म्हणून सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर यांनी भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक समायोजन क्षमता या शैक्षणिक मानसशास्त्राच्या विषयात पीएच. डी. संपादन केलेली आहे. गेली एकवीस वर्ष त्यांच्या जवळ शिक्षक प्रशिक्षक व विभाग प्रमुख म्हणून अनुभव आहे. त्या नगर शहरात शासन नियुक्त स्वच्छता दूत म्हणूनही कार्यरत आहेत. बालकांची शैक्षणिक वाटचाल व पालकांच्या अपेक्षा या वर प्रा. डॉ. भांडारकर प्रकाश टाकणार आहेत. या सर्व तज्ञ पालकांच्या प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तर देणार आहेत.
याच कार्यक्रमात तीन भाग्यवान पालकांची पालाक्त्वासंबंधी प्रत्यक्ष मोफत समुपदेशनासाठी निवड केली जाणार आहे. तसेच दहा विद्यार्थांना गणित फाऊंडेशन कोर्स 1 महिन्यासाठी मोफत दिला जाणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून, कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका पास अकॅडेमी, पत्रकार चौक, अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 7276689011 व 7387125011 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.