जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उमेद सोशल फाउंडेशन व ईएचएच प्रा.लि. चा उपक्रम
भातोडी पारगावात होणार 200 वृक्षांची लागवड
पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा -विक्रम गायकवाड
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथे शरीफराजे मालोजीराजे भोसले यांच्या समाधी परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण अभियान राबविण्यात आला. उमेद सोशल फाउंडेशन व ईएचएच प्रा.लि. यांच्या वतीने सुरु असलेल्या पर्यावरण संवर्धन सप्ताहातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमाची सुरुवात शरीफराजे भोसले यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून, अभिवादनाने करण्यात आली. गावचे सरपंच विक्रम गायकवाड यांनी उमेद सोशल फाउंडेशन व ईएचएच प्रा.लि. ने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करुन पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. सामाजिक कार्याबरोबरच पर्यावरणाच्या प्रश्नासाठी उमेदचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार आदीनाथ शिंदे यांनी उमेद फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला युवा वर्ग जोडला जात आहे. सामाजिक निस्वार्थ कार्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानातंर्गत भातोडी गावात 200 झाडांची लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला. उमेद सोशल फाउंडेशनचे सल्लागार ॲड. दिपक धीवर यांनी भविष्यातील संघटनेची वाटचाल व सामाजिक कार्याची माहिती दिली.
फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, निसर्ग वाचवला तरच भविष्यात मानव सुरक्षित राहील. आपल्याला निसर्ग फक्त वापरण्यापुरता नाही, तर त्याचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी आहे. आज आपण येथे 200 झाडे लावण्याचा संकल्प घेतला आहे. परंतु हे फक्त सुरुवात आहे. या झाडांची निगा राखणे, त्यांना जगवणे हेच खरी जबाबदारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी उमेद सोशल फाउंडेशनचे सचिव सचिन साळवी, सल्लागार ॲड. दिपक धीवर, सोशल मिडियाचे विजय लोंढे, प्रकाश भालेराव, ईएचएच प्रा.लि.चे सीईओ दिपक ढवळे, सदस्य कैलास गांगर्डे, शाकिर मुलानी, जालिंदर लबडे, दिलीप अरणकल्ले, अशोक होळकर, विठ्ठल कुचे, राजेंद्र काळे, अरुण घोलप, संतोष कदम, शामराव लबडे, विलास लबडे, गणपत शिंदे, घनश्याम लबडे, ॲड. दिपक कदम आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी उमेदचे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे व वनरक्षक विजय चेमटे यांचे मार्गदर्शन लाभले.