• Tue. Jul 22nd, 2025

कॅबिनेटच्या बैठकीत प्रश्‍न मांडून प्रश्‍न सोडविण्याची पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी

ByMirror

Jun 10, 2025

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा -जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे

गंभीर आजार झाल्यास शिक्षक, शिक्षकेतरांना करावी लागते उसनवारी

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


राज्य सरकार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हिताचा विचार करत आहे, पण शिक्षक-शिक्षकेतर वर्गासाठी अत्यंत आवश्‍यक अशी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू नाही. एखादा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजारी पडल्यास या योजनेमुळे त्याच्या कुटुंबाल मोठा आधार मिळणार आहे. बऱ्याच वेळा शिक्षकांकडे उपचारासाठी पैसे नसतात, पैसे उभे करण्यात कुटुंबातील व्यक्तीना खूप त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या नियमानुसार उपचार पूर्ण झाल्यावर फाईल जमा करू खर्च दिला जातो. पण ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ असून, गंभीर आजार झाल्यास उसनवारी करुन शिक्षकांना उपचाराचा खर्च भागवावा लागत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


येत्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजनेचा लाभ मिळवून देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी केली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते. या मागणीसाठी उमेश भोईटे, अमोल क्षीरसागर, बाबासाहेब गवते, सुनील अंगारखे, सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी सदस्य महिला आघाडी प्रमुख येणाऱ्या काळात योजना लागू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *