कार्यक्षम कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- कर्तव्यदक्षपणे अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले बाळासाहेब कनगरे यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. कनगरे यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावून सर्वसामान्यांचे रक्षण करुन गुन्हेगारीवर वचक निर्माण केला. प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची बढती करण्यात आली आहे.
कनगरे यांनी पोलीस हवालदार पदापासून आपल्या कार्याला सुरुवात केली. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावून त्यांनी कर्तव्य उत्तमपणे बजावले. बाळासाहेब कनगरे यांनी ही संधी म्हणजे कर्तव्यनिष्ठेचा सन्मान असून, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या बढतीबद्दल पोलीस दलातील अधिकारी, सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश थोरात, अरुण जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले.