नेत्रदान चळवळीतील प्रभावी कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी अहिल्यानगर येथील नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत रानडे यांनी केली.
जालिंदर बोरुडे हे गेल्या 32 वर्षापासून अहिल्यानगरसह महाराष्ट्रात नेत्रदान चळवळ प्रभावीपणे राबवित आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी निवड केली असल्याची माहिती संस्थेचे सचिव यशवंत भोसले यांनी दिली. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असून, महाराष्ट्रात प्रभावीपणे नेत्रदान चळवळ राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी दिली. बोरुडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.