• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

बेपत्ता अंजली दसपुते यांचा शोध सुरु

ByMirror

May 22, 2025
घरातून निघून गेल्याने अद्यापि ठावठिकाणा नाही

घरातून निघून गेल्याने अद्यापि ठावठिकाणा नाही


कुठे आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार अंजली काकासाहेब दसपुते या मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता आहेत. अंजली यांचे वय 33 वर्षे असून, त्या मुकबधीर आहेत. दि. 11 मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता कोणालाही काही न सांगता त्या घरातून निघून गेल्या आहेत. त्यानंतर आजतागायत त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही.


अंजली यांचे दिव्यांग पती काकासाहेब दसपुते यांनी सर्व नातेवाईकांकडे, ओळखीच्या ठिकाणी तसेच परिसरातील विविध भागात शोध घेतला, मात्र कुठेही त्यांचा पत्ता लागला नाही. परिणामी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


अंजली दसपुते यांच्याविषयी कोणालाही काही माहिती असल्यास अथवा त्या कुठे आढळल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशनशी किंवा 9922717520 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *