नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 19, डी.डी. कर्वे यांनी आरोपी रेवणनाथ गंगाराम इंगळे यांना 6 महिन्यांचा साधा कारावास व रक्कम रुपये 12 लाख 23 हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले आहे.
आरोपी रेवणनाथ गंगाराम इंगळे यांनी फिर्यादी सोसायटी नामे भारतीय मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जामखेड रोड यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याचे परताव्यापोटी त्यांनी सोसायटीस धनादेश दिलेला होता. सदर धनादेश न वटल्याने फिर्यादी सोसायटीने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणांमध्ये कोर्टाने आलेल्या पुराव्याचा विचार करून आरोपींना 6 महिन्याचा साधा कारावास व 12 लाख 23 हजार रुपये रकमेचा दंड ठोठावला आहे. दंड रक्कम न भरल्यास पंधरा दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा देण्याचे आदेश केले आहे. सदर प्रकरणात फिर्यादी सोसायटीच्या वतीने ॲड. अमित विजय राशिनकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मिलिंद घोरपडे यांनी सहकार्य केले.