• Wed. Apr 16th, 2025

अरुणकाकांच्या स्वास्थ्यासाठी तारकपूरच्या गुरुद्वारामध्ये लंगर

ByMirror

Apr 14, 2025

आजारातून बरे होण्यासाठी अरदास; शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव व महिलांची उपस्थिती

नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर मधील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गुरुद्वारामध्ये कीर्तन करुन अरुणकाकांच्या दिर्घायुष्यासाठी अरदास (प्रार्थना) करण्यात आले. याप्रसंगी शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, ते आजारातून बरे होण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रार्थना करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने गुरुद्वाऱ्यात लंगरचे आयोजन करण्यात आले होते. भाईसाहेब कर्नल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी जनक आहुजा, हरजीतसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, अनिश आहुजा, ठदामोदर बठेजा, गुलशन कंत्रोड, संजय आहुजा, अभिमन्यू नय्यर, विकी कंत्रोड, कैलाश नवलानी, जतीन आहुजा, किशोर कंत्रोड, किशन पंजवानी आदी उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, अरुणकाका जगताप हे सर्व नगरकरांचे भूषण आहे. शहराच्या विकासासाठी मोठे योगदान देऊन त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. त्यांची तब्यत बिघडल्याने ते उपचार घेत असून, ते लवकरात लवकर आजारातून बरे होण्यासाठी सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळामध्ये प्रार्थना सुरु आहे. त्यांचे स्वास्थ्य चांगले होण्यासाठी ईश्‍वराला साकडे घालण्यात आले आहे. ते लवकर बरे होवून आपल्या सोबत पुन्हा सामाजिक कार्यासाठी रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *