हनुमान चालीसाचे पठण करुन दिर्घायुष्यासाठी प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- भिंगारकरांच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी भिंगार वेस येथील मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली. तर हनुमान चालीसाचे पठण करुन अरुणकाकांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी संजय सपकाळ, संभाजी (तात्या) भिंगारदिवे, संपत (तात्या) बेरड, शिवम भंडारी, दिपक लिपाने, अक्षय नागापुरे, तोडमल सर, सुदामराव गांधले, रमेश वराडे, सुनील लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, महेश नामदे, किशोर उपरे, रुद्रवारशेठ, भाऊ कर्डिले, जनार्धन भिंगारदिवे, उद्योजक किशोर उपरे, कमलेश राऊत, करण पाटील, रत्नदीप गारुडकर, विशाल (अण्णा) बेलपवार, अभिजीत सपकाळ, रतनदीप दरवडे, प्रशांत डावरे, रवी नामदेव, रवींद्र राहींज, दीपक राहींज, भगवान नागपुरे, प्रशांत हातरूनकर, प्रज्योत लुनिया, प्रमोद जाधव, भाऊ राऊत, संतोष बोबडे आदी उपस्थित होते.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, भिंगारच्या मारुती मंदिरात अरुणकाकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व भिंगारकरांच्या वतीने मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
संजय सपकाळ म्हणाले की, अरुणकाका जगताप हे सर्व नगरकरांचे भूषण आहे. त्यांची प्रकृतीसाठी सर्व समाजातील जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहे. त्यांचे स्वास्थ्य चांगले होण्यासाठी देवाला साकडे घालण्यात आले आहे. ते लवकर बरे होवून आपल्या सोबत पुन्हा सामाजिक कार्यासाठी रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संभाजी (तात्या) भिंगारदिवे यांनी देखील सर्व जाती-धर्माचे लोक ईश्वराकडे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे, ही सर्वांची मनोकामना असल्याचे त्यांनी सांगितले. शिवम भंडारी यांनी अरुणकाका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांना आधार देवून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. भिंगारकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ते चांगले व्हावे हे प्रत्येक भिंगारकरांची देवाकडे प्रार्थना असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.