शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधवांची मनोभावे प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर मधील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुधवारी (दि.9 एप्रिल) अरदास (प्रार्थना) करण्यात आली. या प्रार्थनेत शीख, पंजाबी व सिंधी समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळेस मेरा वेद गुरु गोविंदा! हर हर नाम औखध मुख देवें, काटे जम की फांसा!! हे शब्द भजन करण्यात आले.
प्रारंभी गुरुद्वारामध्ये कीर्तन करण्यात आले. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, ते आजारातून बरे होण्यासाठी भाईसाहेब कर्नल सिंह यांनी जपजी साहेब पाठ, चौपाई साहेब पाठ करुन अरदास केली.
तर सामुदायिकपणे अरुणकाकांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी जनक आहुजा, हरजीतसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, राकेश गुप्ता, महेश मध्यान, जगजीतसिंह गंभीर, अनिश आहुजा, ठाकूर नवलानी, दामोदर बाठेजा, गुलशन कंत्रोड, सतीशशेठ गंभीर, मनोज मदान, जय रंगलानी, संजय आहुजा, अभिमन्यू नय्यर, किशोर रंगलानी, सिमरजीतसिंग वधवा, कैलास नवलानी, कन्हैया बालानी, सुरेश हिरानंदानी, राजू जग्गी, जगदीश बजाज, किशोर कंत्रोड, चमनलाल कुमार, मॉन्टी तलवार, विशाल अरोरा, रोहित सरणा, बबलू नवलानी, करण धुप्पड, प्रदीप धुप्पड, प्रवीण आहुजा, कुणाल गंभीर, किशन पंजवानी, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, शंकर अंदानी, हिरु खुबचंदानी, सुमित नवलानी, श्री गुरली, लकी खुबचंदानी, करण आहुजा आदी उपस्थित होते.