• Sun. Apr 20th, 2025

ढोरसडे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

ByMirror

Apr 4, 2025

समाजात अशांतता प्रस्थापित करुन मुख्य प्रश्‍नांपासून लक्ष विचलीत केले जात आहे -सुशांत म्हस्के

ग्रामीण भागातही रिपाईच्या संघटनला गती

नगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, आर्थिक विषमता, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाच्या प्रश्‍नांवर पडदा टाकण्यासाठी केंद्र व राज्य सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहे. समाजात अशांतता प्रस्थापित करुन सर्वसामान्यांचे लक्ष विचलीत करण्याचे काम होत आहे. समाजातील महिला सुरक्षित नसताना त्यांना मंदिर-मस्जिदची सुरक्षा महत्त्वाची वाटू लागली आहे. महिलांच्या प्रश्‍नांसाठी रिपाई महिला आघाडीच्या माध्यमातून सातत्याने लढा सुरु असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी व्यक्त केली.


ढोरसडे (ता. शेवगाव) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी म्हस्के बोलत होते. शेवगाव तालुका रिपाईच्या महिला अध्यक्षा वंदना दळवी व तालुका अध्यक्ष अंकुश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप वाघचौरे, ओबीसी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, राहुरी युवक तालुका अध्यक्ष लखन सरोदे, भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे, राहुल गाडेकर, विल्सन रुकडीकर, अजय बडोदे, विशाल भिंगारदिवे, संपदा म्हस्के, मनीषा गायकवाड, शीतल नाटिकर, संजना गायकवाड, तितली गायकवाड, बाळू निमसे, रामकिसन तासतोडे, गणेश खंगरे, नितीन गायकवाड, भगवत गायकवाड, गणेश गायकवाड, दादा गायकवाड, दिनेश खिल्लारे, आर्यन खिल्लारे, भावराव वाघमारे, माजीक गायकवाड, राजू गायकवाड, विनोद गायकवाड, अरुण गायकवाड, मोजन तुपसुंदर, रमेश पहिलवान, पप्पू पहिलवान, बाबासाहेब दळवी, रावसाहेब शिरसाठ, हरिभाऊ गायकवाड, चिकू गायकवाड आदींसह रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


वंदना दळवी यांनी तालुक्यात महिलांचे संघटन करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील महिला असुरक्षित असून, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहे. जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून लढा दिला जाणार असल्याचे, ते म्हणाल्या.


रिपाईच्या ढोरसडे महिला आघाडीच्या शाखेच्या अध्यक्षपदी सुरेखा गायकवाड, संघटकपदी जिजाबाई गायकवाड, सचिवपदी प्रीती गायकवाड, खजिनदारपदी रंजना गायकवाड, शाखा कार्याध्यक्षपदी निकिता गायकवाड यांची नियुक्ती करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाखेच्या महिला सदस्या चंद्रकला गायकवाड, नंदा गायकवाड, मंगल गायकवाड, जाईबाई गायकवाड, सोनम खिल्लारे, सोनाली गायकवाड, सविता गायकवाड, मयूबाई खिल्लारे, नंदा गायकवाड, अपेक्षा गायकवाड, राणी गायकवाड, कोमल गायकवाड, राजश्री गायकवाड, सोना खिल्लारे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *