• Wed. Oct 15th, 2025

30 मार्चला प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

ByMirror

Mar 22, 2025

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा 2025 परीक्षेतील गुणवत्ता यादीत स्थान पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ रविवार दि. 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता केडगाव, पुणे रोड येथील निशा लॉन्स मध्ये आयोजित करण्यात आला आहे. सदर परीक्षा 19 जानेवारी रोजी जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली होती. या मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


इयत्ता 4 थी, 5 वी, 7 वी, 8 वी करिता मराठी व इंग्रजी माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी माध्यमाच्या गुणवत्ता यादीत अकराव्या व इंग्रजी माध्यमाच्या एक ते पाच स्थानापर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व इयत्ताचे प्रथम तीन क्रमांकासाठी प्रमाणपत्र गौरव चिन्ह व रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या निकालासह गुणवत्ता यादी प्रकाशित झाली असून, संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी www.vpahmednagar.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा गौरव समारंभास उपस्थित रहावे.


प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान व विद्या प्रतिष्ठान (महा.) व्द्वारा संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, केडगाव द्वारा आयोजित अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षेचे गेल्या 34 वर्षापासून यशस्वी आयोजन करण्यात येते. या परीक्षेची विश्‍वासार्हतेमुळे दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. या कार्यक्रमात बालकाच्या शैक्षणिक वाटचालीसंबंधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. संबंधित पालक व शिक्षकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन परीक्षेचे संचालक व परीक्षा नियंत्रकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *