• Wed. Oct 15th, 2025

सातत्याने हजर नसणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी

ByMirror

Mar 19, 2025

सह्याद्री छावा संघटनेचा पवित्रा

अधिकाऱ्याच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- मागील काही महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सातत्याने वेळेवर हजर नसल्याच्या आरोपावरुन मंगळवारी (दि.18 मार्च) सकाळी सहाय्यक निबंधक यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करुन सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने गांधीगिरी करण्यात आली. तर वेळोवेळी सदर अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याच्या लेखी तक्रार करुन सुध्दा कारवाई होत नसल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. तर सदर अधिकाऱ्याच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास त्याची खुर्ची उलटी करुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


या आंदोलनात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हजरत शेख, शिवसेना अनुसूचित जाती-जमातीचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, दत्ता वामन, सुभाष काकडे, सामाजिक कार्यकर्ते कचरू वामन, भारत फुलमाळी आदी सहभागी झाले होते.
जिल्ह्याचे विविध कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विविध कामे घेऊन येतात. मात्र मागील सहा महिन्यात सहाय्यक निबंधक आपल्या कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात.

मनमानी पद्धतीने कार्यालयात येतात व निघून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा अधिकाऱ्यांची वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करून त्यांच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. तर सदर अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *