• Fri. Mar 14th, 2025

टोयोटा वेलफायरचे मा.आ. अरुणकाका जगताप यांना वितरण

ByMirror

Mar 14, 2025

देशातील पहिली कार आली नगर शहरात

नगर (प्रतिनिधी)- आरामदायक, हायब्रिड टेक्नोलॉजी आणि प्रगत तंत्रज्ञानाने सजवलेल्या इंटिरिअर, आकर्षक डिझाइन, आणि उच्च-गुणवत्तेच्या फीचर्सचा समावेश असलेल्या टोयोटाच्या वेलफायरचे वितरण मा.आ. अरुणकाका जगताप यांना करण्यात आले. नुकतीच लॉन्च झालेली पाचव्या जनरेशनची भारतातील पहिल्या कारचे नगर शहरात वितरण करण्यात आले आहे.
केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वेलफायरच्या कारचे वितरण मा.आ. जगताप यांना शोरुमचे जनक आहुजा व अनिश आहुजा यांनी केले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप उपस्थित होते.


वेलफायरमध्ये 2.5 इंजिन आहे जे 193 पीएस पॉवर जनरेट करते आणि 240 एनएम टॉर्क आहे. जे चांगले मायलेज देते. वेलफायरचे सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रिड मॉडेल 40 टक्के अंतर आणि 60 टक्के वेळेसाठी झिरो एमिशन मोडमध्ये चालण्यास सक्षम आहे. त्याचे मायलेज 19.28 किमी प्रति लिटर असल्याचे कंपनीचा दावा आहे. कारचे इंजिन पॉवरफुल तर आहेच, शिवाय कार मायलेजच्या बाबतीतही खूप चांगली आहे.


यामध्ये 60 हून अधिक कनेक्टेड फीचरचा समावेश आहे. टोयाटा वेलफायरचे फीचर्सपूर्ण आहे, ज्यामध्ये 60 हून अधिक कनेक्ट केलेल्या फीचर्सचा समावेश आहे. इमरजेंसी सर्व्हिस, व्हीकल डायग्नोस्टिक्स, रिमोट डोर लॉक/अनलॉक आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग अलर्ट, एडीएएस क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, लेन ट्रेस असिस्टन्स आणि हाय बीम एलईडी हेडलॅम्प आहे. टोयोटा वेलफायर ही एक प्रीमियम लक्झरी (मल्टी-पर्पज व्हेइकल) आहे. या कारची निर्मिती जपानमध्ये केली जाते व प्रमुख देशामध्ये त्याची विक्री होते. ही कार आरामदायक व प्रगत तंत्रज्ञानाने सजवलेल्या इंटिरिअर, आकर्षक डिझाइन, आणि उच्च-गुणवत्तेच्या फीचर्ससाठी ओळखली जात असल्याची माहिती जनक आहुजा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *