महिलांनी राजमाता जिजाऊंच्या संस्काराने भावी पिढी घडविण्याचा संकल्प करावा – शिलाताई शिंदे
छावा चित्रपटाने भारावल्या महिला
नगर (प्रतिनिधी)- महिलांनी राजमाता जिजाऊंच्या संस्काराने भावी पिढी घडविण्याचा संकल्प करावा. स्त्री शक्तीने सामाजिक परिवर्तन घडणार आहे. मुली व महिलांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना रोखण्यासाठी आजही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या संस्काराप्रमाणे मुलांना घडविले पाहिजे. यासाठी प्रत्येक महिलेला जिजाऊंची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर शिलाताई शिंदे यांनी केले.
रेल्वे स्टेशन रोड येथील आगरकर मळा येथे महिला दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने माजी महापौर शीलाताई शिंदे यांनी सर्व महिलांचा सन्मान केला. तर परिसरातील महिलांसह अबालवृद्धांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमा दाखविण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ॲड. अनुराधा येवले, संपूर्णा सावंत, रेखाताई विधाते, रेखा पगारिया, रिटा गोरे, शेळके काकू, राधाताई ग्यानप्पा, उषा नामदे, रेखा घोडेकर, सोनाली मुनोत, जया खताळ, पूजा बनभेरू, मीना बनभेरू, स्नेहा खताळ, वैशाली पोळ, तांबे वहिनी, आहेर, अंधारे, विद्या कुलकर्णी, उज्वला कटारिया, अनिता गदिया, मंदा बोरुडे, संगीता बोरुडे, जयश्री गाडळकर, नागवडे, संगीता दहीहंडे, शुभांगी शिंदे, प्राची शिंदे, नागरगोजे काकू, मुळे, रजिता कोंडावार, अंजली कोंडावार आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे शिंदे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणासाठी जीवन सर्मपण केले. तर संभाजी महाराजांनी धर्मासाठी मृत्यूला कवटाळले. हा धगधगता इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होण्याची गरज आहे. शिवकालीन इतिहास हा आजच्या युवकांना प्रेरणा व स्फूर्ति देणार आहे. घराघरातून महाराजांच्या संस्काराने मुले घडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन चित्रपटाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व शिवभक्तांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या जय घोषानाने संपूर्ण परिसर दणाणला. अंगावर शहारे आणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. चित्रपटासाठी उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टिम व एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली होती.
चित्रपट सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य व मुघलांना दिलेली झुंज आदी प्रसंगाने उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात संभाजी महाराजांचा जयघोष केला. महिलांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती. आगरकर मळा येथील मुख्य रस्ता चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या संख्येने गजबजला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष शिंदे, अक्षय शिंदे, शुभम चिपाडे, शंभू चिपाडे, वीरेंद्र कांबळे गौरव शिंदे, राजू लाळगे, मोनू हिरवे, अविनाश गाजरे, यश आगरकर, अक्षय कोंडावार, संकेत पाटील, ओंकार शिंदे, शुभम कावळे, प्रथमेश भापकर, गणेश कचरे, गौरव चीपाडे, समर्थ दहीहंडे, संकेत गवळी यांनी परिश्रम घेतले.