• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

मेहंदीतून रेखाटले शिवराय

ByMirror

Feb 20, 2025
मेहंदीतून रेखाटले शिवराय

मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांचे आपल्या कलाकृतीतून महाराजांना अभिवादन

नगर (प्रतिनिधी)- शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, नगरच्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी मेहंदीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोर्टेट रेखाटून त्यांना आगळ्या-वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले.


प्रियंका आगरकर या अहिल्यानगर येथील प्रयंका मेहंदी स्टुडिओ अँड अकॅडमी च्या संचालिका असून, त्यांनी नैसर्गिक मेहंदीच्या माध्यमातून शिवरायांचे पोर्ट्रेट साकारले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुमारे 2 ते 3 तास अथक मेहनत घेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हुबेहूब चित्र मेहंदीच्या माध्यमातून रेखाटले. शिवरायांचे तेजस्वी रूप आणि शौर्य दर्शवणारे हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


शिवजयंतीच्या सोहळ्यात कला आणि परंपरेचा संगम घडवण्याचा प्रयत्न प्रियंका आगरकर यांनी केला असून, त्यांच्या या नवकल्पनात्मक कार्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या सृजनशील कलाकृतीमुळे शिवभक्त आणि कलाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *