मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मुंगेकर यांच्या हस्ते गौरव
नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय लक्ष्मण कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील घाटकोपर येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. हे पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुंगेकर यांच्या हस्ते कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
रमाबाई नगर शहिद हॉलमध्ये झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी मराठी चित्रपट क्षेत्रातील अभिनेते तथा दिग्दर्शक विजय पाटकर, अजय तपकिरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे महासंपर्क प्रमुख उत्तमराव तस्करी, क्राइम ब्रँच नवी मुंबईचे रणजीत पाटील मॅडम, अभिनेत्री दिगंबर कोळी, राकेश मोहिते, आशिष सातपुते, हास्य सम्राट अनिताताई पाटोळे, राजू मानकर, विजय भोसले आदी उपस्थित होते.
विजय कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून विशेषतः तरुणांना शिक्षण, नोकरी निवडीसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यांची मदत आणि मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. गरजू घटकातील नागरिकांना वैद्यकिय मदत, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याचे ते सातत्याने कार्य करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप कळडक, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य लक्ष्मण महागडे, संतोष हजारे, प्रवीण ओरे, सुरेश पानपाटील, मिलिंद घाटेशाही, सचिन वाघमारे, गौतम बनसोडे, नितीन घाटेशाही, बाबा साबळे, सुभाष पानपाटील, जहीर सय्यद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.