• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

डेडिकेटेड टू कॉमन मॅन पुस्तकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन

ByMirror

Feb 9, 2025
पुस्तकातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा

पुस्तकातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा आढावा

नगर (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक प्रा. डॉ. संतोष यादव लिखित डेडिकेटेड टू कॉमन मॅन या पुस्तकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. संतोष यादव, साजिद जहागीरदार उपस्थित होते.


या पुस्तकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीच्या विविध पैलूंचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपदी रुजू झाल्यापासून त्यांनी घेतलेले विविध निर्णय, त्यांचे गाठी भेटी, तसेच विविध जिल्ह्यांमध्ये घेतलेले दौरे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकात शिंदे यांच्या नेतृत्व शैलीचे आणि त्यांच्या कार्यक्षमतेची सखोल माहिती समाविष्ट करण्यात आलेली आहे. प्रा. डॉ. यादव यांचे हे एकनाथ शिंदे यांच्यावर दुसरे पुस्तक असून, त्यांनी शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथ मदतीचा हाथ! हे पुस्तक देखील प्रकाशित केले होते. यामध्ये त्यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांचा समावेश होता.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *