• Mon. Mar 2nd, 2026

उद्बोधन शिबिरात आरएसपी विभागाच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट

ByMirror

Feb 9, 2025

वाहतूक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा

वाहतूकीचे नियम समजण्यासाठी शाळा तेथे आरएसपी युनिटची स्थापना आवश्‍यक- अशोक कडूस

नगर (प्रतिनिधी)- वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्या वतीने अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये एक दिवसीय उद्बोधन शिबिर पार पडले. यावेळी जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी आरएसपी युनिटच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, प्रत्येक शाळेमध्ये आरएसपी युनिट असावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम आणि त्यांचे महत्त्व शिकवता येईल.
लेखाधिकारी तथा आरएसपीचे मार्गदर्शक मनोज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आरटीओ अधिकारी प्रियंका उनवणे, शहर वाहतूक विभागाचे बाबासाहेब बोरसे, रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य विजय पोकळे यांची उपस्थिती होते.
नाशिक-नगरचे विभागीय समादेशक सिकंदर शेख यांनी आरएसपी विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्याचे विवेचन करुन, रस्ते अपघात व नैसर्गिक आपत्ती वाहतूक कोंडी यासंदर्भात युवकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. तर आरएसपी विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाज जागृतीच्या कार्याची माहिती दिली.
जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले यांनी अभ्यासक्रमामध्ये असणारे आरएसपी विभागाचे महत्त्व त्याचबरोबर निरनिराळ्या सण-उत्सवात आरएसपी विभाग वाहतूक शाखेला करत असलेल्या मदतीचा आढावा घेतला. यावेळी आरएसपी विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांना कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. तसेच उपसमादेशकपदी प्रकाश मिंड, अतिरिक्त समादेशकपदी डोफे, जिल्हा कोषाध्यक्षपदी विनायक साळवे, तालुका समादेशकपदी राहुल जाधव (राहुरी), संदीप तारडे (श्रीरामपूर), एकनाथ लगड (नगर शहर), राजेंद्र धस (नगर तालुका), सुनिल दानवे (नेवासा), उर्हे (राहता), दत्तात्रेय घुले (अकोले), विकास सोनवणे (संगमनेर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
आरटीओ प्रियंका उनवणे म्हणाल्या की, भविष्यकाळात दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे . भविष्यात सेन्सर हेल्मेट असावे हेल्मेट शिवाय दुचाकी स्टार्ट होऊ नये, याची गरज आहे. वाहतुकीचे नियम आपल्या सर्वांच्या हिताचे व संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले यांनी सर्व शाळांमध्ये आरएसपी विभाग राबवण्याचे आवाहन केले आणि प्रत्येक शाळेमध्ये एक आरएसपी अधिकारी असणे गरजेचे असल्याचे सांगितले. मे महिन्यात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपसमादेशक प्रकाश मिंड व अतिरिक्त समादेशक चंद्रकांत डोफे यांनी परिश्रम घेतले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *