अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचा पुढाकार
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने सर्जेपूरा येथील बाबुराव इंगळे चौक सबलोक रिक्षा स्टॉपचा शुभारंभ संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले व विकी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष दत्ता वामन, कार्याध्यक्ष विलास कराळे, सरचिटणीस अशोक औशीकर, खजिनदार गणेश आटोळे, संघटक सुधाकर साळवे, नासिर खान, विकास उडानशिवे, शाखा अध्यक्ष विकास धाडगे, उपाध्यक्ष बाळू खुडे, नितीन पवार, खजिनदार विकी चव्हाण, संतोष भोसले, संदीप वैरागर, सागर खुडे, मनोहर चखाले, राजू कांबळे, जफर काझी, अज्जू पठाण, समीर सय्यद, सोमनाथ सकट, सतीश लोंढे, लखन लोखंडे, मोजेस साळवे, पवन शेरकर, राम खुडे, बोरुडे, सचिन कनगरे आदींसह रिक्षा चालक उपस्थित होते.
अविनाश घुले म्हणाले की, संघटनेला रिक्षा चालक जोडले जात असताना त्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी देखील वाढत आहे. रिक्षा चालकांना संघटित करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. आरटीओ कार्यालय, शहर वाहतुक शाखेशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी संघटना रिक्षा चालकांच्या पाठिशी उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
विकी इंगळे म्हणाले की, बेरोजगार युवक रिक्षाचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक नागरिकांना सेवा देण्याचे काम करत असून, त्यांचे शासनस्तरावरील प्रश्न संघटितपणे केलेल्या पाठपुराव्याने सुटणार आहे. तर रिक्षा चालकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.