विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे व विकी इंगळे यांच्या हस्ते ध्वाजरोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तोफखाना पोलीस स्टेशनचे सुनिल शिरसाठ, दीपक साबळे, राजू (मामा) दिनकर, अशोक भोसले, रमेश केजरला, समीर सय्यद, सागर वाळुंज, क्षितिज व परिस बालभावनातील सर्व सहकारी, परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रकाश वाघमारे म्हणाले की, आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार आहे. रामवाडी भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व सार्वजनिक स्वच्छतेसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकी इंगळे म्हणाले की, रामवाडी भागात सर्वसामान्य कष्टकरी वर्ग राहत आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या या भागातील नागरिकांना विविध-सोयी सुविधा मिळण्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.