स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होतो -ॲड. सुरेश लगड
जय युवा अकॅडमी व डॉ. आंबेडकर फाउंडेशनचा उपक्रम; लोककलावंतांचा सन्मान
नगर (प्रतिनिधी)- स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होतो, बुद्धीला चालना मिळते. खेळातून खेळाडूवृत्ती जोपासली जाते. आकलन क्षमता विकसित होते व आत्मविश्वास वाढते. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विचारशक्तीला चालना देण्याचे आवाहन विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड यांनी केले.
सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत डॉ. आंबेडकर फाउंडेशन (नवी दिल्ली) व जय युवा अकॅडमी आयोजित सावित्रीबाई फुले जयंती उत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ॲड. लगड बोलत होते. यावेळी मनपा माजी स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवले, मेजर भीमराव उल्हारे, शाहीर कान्हू सुंबे, नोटरी पब्लिक ॲड. महेश शिंदे, जय युवाच्या सचिव जयश्री शिंदे, अनंत द्रविड, अनिल साळवे, आरती शिंदे आदी उपस्थित होते.
किशोर डागवाले म्हणाले की, लोककलेतून सामाजिक जनजागृती होते. सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य पारंपारिक लोककलावंतांच्या माध्यमातून समाजासमोर आणता येते. देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम राबविले गेले पाहिजेत. सांस्कृतिक कार्यक्रम हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्यातील योगदान व शिक्षण क्षेत्रातील क्रांती या विषयावर माहिती दिली. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात मंदाताई फुलसौंदर यांनी प्रबोधन पर गीते सादर केली. स्वप्निल गायकवाड यांनी भेदिक कला, प्रकाश शिंदे यांनी बहुरूपी, दत्तू वाजे यांनी वाघ्या-मुरळी, संपत ससे, नारायण ससे यांनी भक्ती गीते सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन शाहीर कान्हू सुंबे यांनी केले होते. विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सादरीकरणासाठी राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, संतोष लयचेट्टी, रवी वाघ, मिया सय्यद, हमीदभाई शेख, प्रा. हर्षल आगळे, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. भास्कर रणनवरे, पोपट बनकर, अश्विनी वाघ, कावेरी कैदके, ॲड. पुष्पा जेजुरकर, विद्या शिंदे, रजनीताई ताठे, उज्वला उल्हारे, बाबू काकडे, कांचन मधे, सुवर्णा कैदके, मीना म्हसे, कल्याणी गाडळकर, गौतम कुलकर्णी, रोहिणी थोरात, शिवाजी वेताळ, रावसाहेब काळे, विनोद साळवे, निलेश रासकर, रावसाहेब मगर, गणेश बनकर, सुभाष जेजुरकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे:-
निबंध स्पर्धा प्रथम- समीक्षा सवाई, द्वितीय- खंडू फुंदे, तृतीय- अंकिता निमसे.
चित्रकला स्पर्धा प्रथम- ऋतुजा शिंदे, द्वितीय- देवयानी काटे, तृतीय- जयश्री कोल्हे.
हस्ताक्षर स्पर्धा प्रथम- भूषण कैदके, द्वितीय- प्रीती खैरे, तृतीय- श्रद्धा गायकवाड.
वक्तृत्व स्पर्धा प्रथम- सानिका खैरे, द्वितीय- प्रिया झपके, तृतीय- संस्कृती कोतवाल.
वैयक्तिक नृत्य प्रथम- सौरभ खताडे, द्वितीय- राजेश्वरी किल्लोर, तृतीय- श्रुती खळदकर.
समूह नृत्य स्पर्धा प्रथम- ऑक्झिलियम हायस्कूल, द्वितीय- शासकीय परिचर्या महाविद्यालय, तृतीय- शिंगवे नाईक महिला मंडळ.
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम- तुषार शेंडगे, द्वितीय- अमोल तांबडे, तृतीय- जयेश शिंदे.