राज्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा सहभाग; शिक्षकांसाठी देखील पार पडली अध्यापन कौशल्य कथन स्पर्धा
नगर (प्रतिनिधी)- शहरातील जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयात कै. डॉ. कला ताई जोशी स्मृती करंडक अंतर्गत कर्णबधिर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धा उत्साहात पार पडली. तर कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्यापकांसाठी अध्यापन कौशल्य कथन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कर्णबधिर विद्यार्थ्यांसह त्यांना अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये राज्यभरातून 22 शाळांनी सहभाग नोंदवला.
सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी व सचिव डॉ. ओजस जोशी यांच्या हस्ते झाले. तर दुपारच्या सत्रात स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी स्नेहालयाचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, जि.प. जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी संस्थेच्या डॉ. कलाताई जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. कलाताई यांचे कार्य पाहून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देविदास कोकाटे यांनी कर्णबधीर विद्यार्थ्याच्या शैक्षणीक प्रगतीसाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धेत अजून सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. ओजस जोशी म्हणाले की, कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन न थांबता, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठी पालकांचा सहभाग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. या मुलांना वेगळे व्यासपीठ निर्माण करुन त्यांच्या पुनर्वनासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे परीक्षण सदाशिव पुंडे, विक्रम मुंडे, स्वाती काटकर, प्रियांका दांडेकर यांनी केले. संस्थेच्या प्रगतीचा आढावा विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय आरोटे यांनी घेतला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे रुपये 1001, 701, 501, 301 रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह विद्यार्थ्यांना देण्यात आले. तर विजेत्या शिक्षकांना अनुक्रमे 9999, 7777, 5555 रुपये रोख रक्कम, गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देशमुख, सुदाम चौधरी यांनी केले. आभार कलाशिक्षक शिवानंद भागरे व सहदेव कर्पे यांनी मानले.
—–
वाचा कौशल्य स्पर्धा
9 ते 12 वयोगटात प्रथम- तन्मय सागर विटकर (अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट पुणे), द्वितीय- श्वर्या नितीन भिसे (हडपसर कर्णबधिर विद्यालय पुणे), तृतीय- रियाज मुलानी (रोटरी कर्णबधिर विद्यालय तिळवणी इचलकरंजी), उत्तेजनार्थ- कृती अर्जुन वावरे (शापरिया कर्णबधिर विद्यालय पालघर).
12 ते 15 वयोगटात प्रथम- तनिषा प्रवीण गोधळे (बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे), द्वितीय- वेदांती विठ्ठल करपे (संस्कार विद्यालय बीड), तृतीय- वेदांत विशाल दळवी (इंडियन रेडक्रॉस पुणे), उत्तेजनार्थ- आराध्या रवींद्र बनणे (रोटरी कर्णबधिर विद्यालय इचलकरंजी तिळवणी)
15 ते 18 वयोगटात प्रथम- दिपाली मच्छिंद्रनाथ जोरवेकर (संग्राम मूकबधिर विद्यालय संगमनेर), द्वितीय- प्राची उद्धव खोमणे (रघुनाथ केले श्रवण विकास विद्यालय धुळे), तृतीय- स्नेहल लक्ष्मण मोहोळे (निवासी मूकबधिर विद्यालय उमरगा), उत्तेजनार्थ- सिद्धी विजय शेलार (जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय अहिल्यानगर)
–
चित्र वाचन स्पर्धा
9 ते 12 वयोगट प्रथम- गहूबाई विभुते (मूकबधिर निवासी शाळा कुर्डूवाडी सोलापूर), द्वितीय- माधुरी राजेंद्र पाटील (रघुनाथ केले वाघ श्रवण विद्यालय धुळे), तृतीय- स्वरांजली सचिन लेंगरे (बधीर मूक शिक्षण केंद्र पुणे), उत्तेजनार्थ- योगेश बिभीषण कुंभार (हनुमंतराव पाटील निवासी मूकबधिर विद्यालय विटा जिल्हा सांगली),
12 ते 15 वयोगटात प्रथम- अनुष्का धनंजय लकडे (हडपसर कर्णबधिर विद्यालय हडपसर), द्वितीय- प्रांजली लिंबराज भोजने (बधीर मूक विद्यालय बार्शी सोलापूर), तृतीय- मयूर नवनाथ भोंडवे (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय अहिल्यानगर), उत्तेजनार्थ- चैतन्य शिवाजी खेडकर (लायन्स मूक बधिर विद्यालय व अपंग विद्यालय कोपरगाव),
15 ते 18 वयोगटात प्रथम- मिताली राजेंद्र धूत (जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय अहिल्यानगर), द्वितीय- श्रावणी सुदर्शन जाधव (हनुमंतराव पाटील निवासी मूक बधिर विद्यालय विटा), तृतीय- कोमल संजय राठोड (बधिर मूक विद्यालय बार्शी), उत्तेजनार्थ- शिवकांता लक्ष्मण पलेलवाड (चिंचवड बधिरमुक विद्यालय निगडी).
—
अध्यापन कौशल्य कथन स्पर्धा शिक्षक गट
प्रथम- अनिता महेश औटी (बधीर मूक शिक्षण केंद्र पुणे), द्वितीय- अर्चना संभाजी मुतोन्डे ( सग्राम मूक बधिर विद्यालय संगमनेर) व तृतीय- विश्वनाथ महादेव होनमुर्गीकर (तिळवणी कोल्हापूर).