विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थांसह लावले भाजीपाला व फळांचे स्टॉल
व्यवहारिक ज्ञान अनुभवातून विकसीत होतो -प्रा. शिवाजीराव विधाते
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानासह आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या सकस खाद्य पदार्थांचे धडे गिरवले. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या विविध खाद्य पदार्थांचे स्टॉलसह भाजीपाला व फळांचे स्टॉल या आनंद मेळाव्यात लावण्यात आले होते.
बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस प्रा.शिवाजीराव विधाते यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. तर काही विद्यार्थ्यांनी हिरवे फळ-भाज्या देखील विक्रीस ठेवल्या होत्या. पाणीपुरी, समोसे, पापडभाजी, इडली सांबर आदी विविध खाद्यांचे तब्बल 18 स्टॉलचा समावेश होता.
प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची देखील गरज आहे. व्यवहारिक ज्ञान अनुभवातून विकसीत होत असतो. तर फास्टफुडच्या युगात विद्यार्थ्यांना शरीरास पोषक व हानीकारक असलेले खाद्य पदार्थ देखील समजणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी म्हस्के म्हणाले की, लहान वयातच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानाला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक नीता जावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता म्हस्के यांनी केले. सविता सोनवणे यांनी आभार मानले.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी…………………..