जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या महिला कुस्तीपटूंचे यश
नगर (प्रतिनिधी)- येथील जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मधील तीन महिला कुस्तीपटूंची वर्धा येथे होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. दिव्या भाऊसाहेब धावडे ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
नुकतेच पार पडलेल्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दिव्या भाऊसाहेब धावडे (53 किलो वजन गट), दिव्या चंद्रकांत पोळ (68 किलो वजन गट) व रूपाली वसंता शिंदे (50 किलो वजन गट) या महिला कुस्तीपटूंची सदर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिव्या पोळ सातारा जिल्ह्याचे तर रूपाली शिंदे हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकतेच लखनऊ येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर साई कुस्ती स्पर्धेत रुपाली शिंदे हिने रौप्य पदक पटकाविले आहे. तिन्ही कुस्तीपटू जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात वस्ताद भाऊसाहेब धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
