• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

नगरची लेखिका शुभांगी माने-कऱ्हाडे यांच्या स्ट्रेस फ्री, फिल फ्री, ॲण्ड चेंज युवर लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन

ByMirror

Dec 16, 2024
तणावमुक्तीने आनंदी जीवन जगण्यासाठी पुस्तक ठरतेय मार्गदर्शक

तणावमुक्तीने आनंदी जीवन जगण्यासाठी पुस्तक ठरतेय मार्गदर्शक

नगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाचे जीवन तणावाने ग्रासलेले असताना तणावमुक्तीने आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक ठरण्यासाठी नगरच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका शुभांगी माने-कऱ्हाडे यांनी स्ट्रेस फ्री, फिल फ्री, ॲण्ड चेंज युवर लाईफ हे पुस्तक लिहले आहे. दिल्ली येथील ड्रीम बुक पब्लिकेशन या नामांकित संस्थेमधून पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.


आपण एक वेगळे व्यक्ति आहोत. आणि आयुष्य हे आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करण्यासाठी मिळालेली संधी आहे. आयुष्यात दुःख, अडचणी सगळ्यांनाच येतात. त्यातून आपल्याला जर कोणी बाहेर काढणारे असेल तर ते आपणच आहोत. याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे स्ट्रेस फ्री, फिल फ्री, ॲण्ड चेंज युवर लाईफ हे पुस्तक आहे.
पहिली पायरी चढल्यावरच दुसरी पायरी येते. एका पायरीवरून आपल्याला लगेच शेवटच्या पायरीवर पोहचता येत नाही. म्हणजेच आपल्याला पहिल्या पायरी पासून सुरुवात करावी लागते. हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी ऊर्जा स्त्रोत बनेल याच आशेतून हे पुस्तक लिहिले गेले असल्याची भावना लेखिका शुभांगी माने-कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.


केवळ देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील लोकांना देखील हे पुस्तक वाचता यावं. विचारांची देवाण-घेवाण व्हावी याचा विचार करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. आयुष्यात अनेक चढउतारातून गेल्यावर मला अस समजल की, ह्या टप्प्यामधून फक्त मी एकटी जात नाही तर, माझ्यासारखे बरेच जण आहेत. आणि माझ्याकडून स्ट्रेस फ्री, फिल फ्री, ॲण्ड चेंज युवर लाईफ नावाचं पुस्तकं लिहले गेले. हे पुस्तक ताण तणावातून बाहेर निघण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत असल्याचे लेखिका माने-कऱ्हाडे यांनी म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *