• Tue. Mar 3rd, 2026

चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचे शहरात आयोजन

ByMirror

Dec 12, 2024

विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल, युवकांसाठी विविध स्पर्धा आणि बचट गटांच्या विविध स्टॉलचा समावेश

बचत गटांना सहभागी होण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, युवकांच्या कला-गुणांना चालना देण्यासाठी व विविध कार्यक्रमासह सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेल्या चार दिवसीय सावित्री ज्योती महोत्सवाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. बचत गट स्टॉल वस्तू विक्री प्रदर्शन सावेडी येथील गुलमोहर रोड, कोहिनूर मंगल कार्यालयात 9 ते 12 जानेवारी येथे घेण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या कोट्यवधी रुपयांची उलाढालनंतर जिल्ह्यासह राज्यातून बचत गटांचे स्टॉल यामध्ये सहभागी होणार आहेत. दरवर्षी शासनाच्या विविध विभागाला सोबत घेऊन महोत्सव साजरा केला जात असून, या महोत्सवाचे हे नववे वर्ष आहे.


राज्यभरात विविध वस्तूंचे स्टॉल्स व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दरवर्षी यामध्ये सहभागी होत असतात. या महोत्सवांमध्ये मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, दंत तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, सर्व जातीय वधू वर मेळावे, वक्तृत्व, नृत्य, चित्रकला उखाणा, भजन, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक संस्थांना मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव अभियान, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान, युवा सप्ताह, स्वामी विवेकानंद जयंती, सावित्री ज्योती गौरव पुरस्कार, कवी संमेलन, लोककला सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रमाचे या महोत्सवामध्ये नियोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक ॲड. महेश शिंदे व पोपट बनकर यांनी दिली.


महोत्सवाच्या संयोजनामध्ये जयश्री शिंदे, राजकुमार चिंतामणी, आरती शिंदे, ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. प्रणाली चव्हाण, दिनेश शिंदे, सुहासराव सोनवणे, भीमराव उल्हारे, गणेश बनकर, रावसाहेब मगर, राजेंद्र उदागे, मीना म्हसे, रावसाहेब काळे, सुनील मतकर, रजनी ताठे, कांचन लद्दे, अश्‍विनी वाघ, अनिल साळवे, इसाबाई शेख, अशोक कासार, जयेश शिंदे, बाळासाहेब पाटोळे, डॉ. संतोष गिऱ्हे, नयना बनकर, स्वाती डोमकावळे आदी समिती सदस्य प्रयत्नशील आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी बचत गट स्टॉल धारकांना जुन्या कोर्टाच्या पाठीमागे टांगे गल्ली, पावन गणपती मंदिरा शेजारी संस्थेच्या कार्यालयात नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 9921810096 व 9657511869 क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *