विविध तपासण्या, उपचार व तज्ञांचे मार्गदर्शन; महिलांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
लायन्स, सेवाप्रीत, रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, सेवाप्रीत, रोटरी ई क्लब ऑफ इम्पॉवरिंग युथ यांच्या संयुक्त महिलांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रामचंद्र खुंट येथील डॉक्टर सिमरन वधवाज केअर ॲण्ड क्युअर सेंटर येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने राखी नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्सच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरनकौर वधवा, सेवाप्रीतच्या सविता चड्डा, अन्नू थापर, रोटरीच्या अध्यक्षा स्विटी पंजाबी, सचिव डॉ. बिंदू सिरसाठ, प्रणिता भंडारी, डॉ. कल्पना गायकवाड, डॉ. मानसी असणानी, डॉ. सारिका झरेकर, डॉ. अर्पिता शिंगवी, अंजली कुलकर्णी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात डॉ. सिमरनकौर वधवा म्हणाल्या की, दरवर्षी महिलांसाठी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. कुटुंबात व कामात व्यस्त असलेल्या महिला वर्ग आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काहींची आर्थिक परिस्थिती असताना वेळ अभावी तर काही आर्थिक परिस्थिती अभावी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शरीरयष्टीवरुन आरोग्याची सुदृढता ठरवता येत नाही, यासाठी वेळोवेळी तपासणी गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

राखी फिरोदिया म्हणाल्या की, निरोगी आरोग्य असल्यास जीवनाचा खरा आनंद घेता येतो. महिलांनी कोणताही आजार अंगावर काढू नये, स्वत:ची काळजी घेतल्यास कुटुंबाची काळजी घेता येणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी सर्व तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध झाल्याचा फायदा महिलांना मिळणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी दरवर्षी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिबिराचे कौतुक केले.
डॉ. बिंदू शिरसाठ म्हणाल्या की, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव व चुकीची आहार पध्दतीमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. आजारावर मात करण्यासाठी त्याचे लवकर निदान होणे आवश्यक असल्याचे सांगून, रोटरीच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली.
डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, महिलांसाठी सातत्याने सुरु असलेले हे शिबिर सर्वात मोठी सेवा आहे. वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील मोठ्या आजाराचा धोका टाळता येतो. शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या तपासण्या जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी अरविंद पारगावकर, विमी मक्कर, वीणा जगताप, भावना छाजेड, शितल गांधी, प्रणिता भंडारी, शेरी धुप्पड, नंदिनी जग्गी, जया मेघनानी, रवी नारंग, धनंजय भंडारे, देवेंद्रसिंग वधवा, नंदिनी जग्गी, मनीषा चुग, कोमल वधवा, अस्मिता भगत, मनीषा वधवा, दिशा झालानी, दीक्षा मुनोत, संतोष माणकेश्वर, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, दिलीप कुलकर्णी, निता कासवा, सरस्वती अगरवाल, दीप्ती सहानी, हरजीतसिंह वधवा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी कपूर यांनी केले. आभार डॉ. रश्मी आरडे यांनी मानले.
दिवसभर झालेल्या या शिबिरात शंभरपेक्षा जास्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर थायरॉईड, रक्तातील साखर तपासणी, कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणी, दातांचे विकार व उपचार, नसांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, हात-पायांना मुंग्या येणे, तळपायांची आग, कान, नाक, घसा विकार व उपचार या सर्व तपासण्या अल्प दरात करण्यात आल्या.
