स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविणाऱ्या संस्था व युवा मंडळांचा नेहरु युवा केंद्राच्या वतीने सन्मान
नवनियुक्त जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला यांचे संविधान देऊन स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता, त्यागी वृत्तीने कार्य केल्यास त्या कामाला यश मिळते. समाजासाठी योगदान म्हणून प्रत्येकने समाजकार्य केलेच पाहिजे. शासनाचे अनुदान नसतानाही स्वखर्चाने लोकसभागातून समाजाच्या समस्या सोडविल्यास परिवर्तन घडणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था व युवा मंडळ चांगले कार्य करीत असल्याचे प्रतिपादन नेहरु युवा केंद्राचे नवनियुक्त जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला यांनी केले.
शहराच्या टिळक रोड येथील नेहरु युवक केंद्राच्या कार्यालयात स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. तर नव्याने रुजू झालेले संकल्प शुक्ला यांचा सामाजिक संस्थांच्या वतीने संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना शुक्ला बोलत होते. याप्रसंगी जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, सावित्री ज्योती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे आदी उपस्थित होते.
सुहासराव सोनवणे यांनी नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवती, मंडळ आणि सामाजिक संस्थांना सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले. ॲड. महेश शिंदे म्हणाले की, जय असोसिएशनला संलग्न असलेल्या संस्था व युवा मंडळांनी फक्त अनुदानसाठी उपक्रम न राबविता, स्वयंसेवीवृत्तीने उपक्रम राबवून सामाजिक योगदान देण्याचे सांगितले.
यावेळी जय युवा अकॅडमीचे दिनेश शिंदे, तुषार शेंडगे, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, माहेर फाउंडेशनच्या रजनीताई ताठे, उत्कर्ष संस्थेच्या नयना बनकर, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी, अविनाश काळे, अविनाश पठारे, संजय पडोळे, समर्पण संस्थेच्या कांचन लद्दे, गंगा महिला बचत गटाच्या कल्पना बनसोडे, अहिल्या फाउंडेशनच्या सुवर्णा कैदके, समृद्धी संस्थेच्या प्रकाश डोमकावळे, उमेद फाउंडेशनच्या अनिल साळवे, आदिनाथ ग्रामीण संस्थेचे ॲड. श्रीकृष्ण मुरकुटे, नवनाथ युवा मंडळ तथा डोंगरे संस्थेचे पै. नाना डोंगरे, रयत प्रतिष्ठानचे पोपट बनकर, सप्तशृंगी (अकोले) संस्थेच्या मीना म्हसे, जीवन आधार संस्थेच्या ॲड. पुष्पा जेजुरकर, मानव सेवा प्रतिष्ठानचे प्रा. सुनिल मतकर, उमेद फाऊंडेशनचे सचिन साळवी, प्रगती संस्थेच्या अश्विनी वाघ, निलेश थोरात आदी संस्था, युवा मंडळ, बचत गट सदस्यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचा पेन, डायरी व टोपी देऊन शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
