शहरात 850 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्मे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांसाठी आरोग्य सेवा महत्त्वाची बनली असून, सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.
शिवसेना शहर, निलेश लंके प्रतिष्ठान, विक्रम भैय्या राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट, थोरात आय केअर व अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार लंके बोलत होते.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरात तब्बल 850 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 620 गरजूंना मोफत नंबरचे चष्मे देण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे विक्रम राठोड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता कावरे, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सचिव कुणाल गोसके, खजिनदार वरुन मिस्कीन, अशोक दहिफळे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, सुरेश म्याना, गोरख धोत्रे, अनिल महांकाळ, गौरव ढोणे, उमेश काळे, मुन्ना भिंगारदिवे, गणेश जिंदम, अमोल डफळ, प्रथमेश संभार, सतिश बल्लाळ, प्रथमेश सिंग आदींसह महाविकास आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगीराज गाडे म्हणाले की, समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून, समाजात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिलदारसिंग बीर यांनी बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने सुरु असलेल्या धार्मिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. तर गरजेनुसार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
