भाविकांची दर्शनास गर्दी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. घट स्थापनेनंतर देवीची आरती पार पडली.

प्रारंभी एमआयडीसी परिसरातून देवीची मिरवणुक काढण्यात आली होती. यामध्ये ज्योत घेऊन युवक सहभागी झाले होते. घट स्थापनेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त गोरख कातोरे, राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करुन आकर्षक पाण्याचे कारंजा व कमान उभारण्यात आली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान, होमहवन, देवीचा गोंधळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
