12 मुलांच्या वयोगटात ओऍसीस विजयी
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत सोमवारी (दि.30 सप्टेंबर) 17 वर्षा आतील मुलींच्या गटाचे सामने रंगले होते. यामध्ये 17 वर्षा आतील मुलींच्या गटात दोन सामन्यामध्ये आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला. तर एक सामना अनिर्णित राहिला. 12 मुलांच्या वयोगटात ओऍसीस स्कूलने विजय संपादन केले.
17 वर्षा आतील मुलींच्या गटात आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूल यांच्यात सामना रंगला होता. आर्मी स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामध्ये श्रेया हिने सर्वाधिक 3 गोल केले. तर सोम्या व अदिती यांनी प्रत्येकी 1 गोल केला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. यामध्ये 5-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला.

ओऍसीस स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात झालेला सामना शेवट पर्यंत अटीतटीचा राहिला. यामध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. 0-0 गोलने हा सामना अनिर्णित राहिला.
आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात झालेल्या सामन्यात श्रेया हिने केलेला 1 गोल विजयासाठी निर्णायक ठरला. 1-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने विजय संपादन केले. तसेच रविवारी संध्याकाळी ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द आठरे पाटील स्कूलचा सामना उशीरा पर्यंत सुरु होता. यामध्ये वेदिका ससे हिने 1 गोल करुन आठरे पाटील स्कूलला 1-0 गोलने विजय मिळवून दिला. प्रतिस्पर्धी संघाकडून एकही गोल झाला नाही.

12 वर्ष मुलांच्या वयोगटात पोदार स्कूल विरुध्द ओऍसीस स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात 0-2 गोलने ओऍसीस स्कूलच्या संघाने विजय मिळवला. यामध्ये कुनाल याने उत्कृष्ट खेळ करुन दोन्ही गोल स्वत:च्या नावावर नोंदवून संघाला विजय मिळवून दिला.