महिला सदस्यांचा पुढाकार
गरजू रुग्णांना आरोग्य साहित्य ठरणार आधार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या आस्था आरोग्य केंद्राला गरजू रुग्णांसाठी विविध आरोग्य साहित्याची भेट दिली. सेवाप्रीतच्या वतीने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देण्याचे काम केले जात असून, फाऊंडेशनच्या वतीने गरजू घटकातील रुग्णांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
आनंदवन संस्थेचे ध्यान मंदिरात गणेश सोलापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. निवेदिता उदयन गडाख, सचिव संजय गर्जे, सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख अर्चना खंडेलवाल, गट प्रमुख गीता नायर, गोविंद महाराज निमसे, उदय पालवे, सच्चिदानंद कुरकुटे, परेश लोढा, शहराम तांदळे आदी उपस्थित होते.
आनंदवनच्या आस्था आरोग्य केंद्रासाठी सेवाप्रीतच्या वतीने तीन बेड, दोन कमोड चेअर, दोन वॉकर, ऑक्सिजन यंत्र व इतर साहित्य देण्यात आले. प्रास्ताविकात सचिव संजय गर्जे यांनी आस्था आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी सेवाभावी वृत्तीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. डॉ. निवेदिता गडाख यांनी महिलांनी एकत्र येऊन सेवाप्रीतच्या माध्यमातून उभी केलेल्या सामाजिक चळवळीचे कौतुक केले. प्राचार्या सोनल लोढा व सोलापूरकर यांची यावेळी भाषण झाली.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, समाजात आर्थिक विषमता झपाट्याने वाढत असून, काही लोकांना आरोग्य, शिक्षण व दैनंदिन गरजा भागविणे देखील अवघड बनले आहे. हा वंचित वर्ग आपल्या समाजातील एक घटक असून, त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. ही मदत सत्कर्मी असल्याचे स्पष्ट करुन, या उद्देशाने सेवाप्रीत शिक्षण, आरोग्याच्या सुविधा गरजूं पर्यंत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या सारिका मुथा, लता राजोरिया, जया खंडेलवाल, अर्चना कुलकर्णी, संतोष झालानी, मंजू झालानी, रेखा बंब, अंजली महाजन, देवकी खंडेलवाल, राजश्री बंब, राजश्री रजनी, सीमा खंडेलवाल, ज्योती गांधी, मीना धोखरिया, सविता धोखरिया, नयना भंडारी, सोनल जाखोटिया, शिल्पा खंडेलवाल, बबिता खंडेलवाल, मंजू बुडवारिया, नीलम खंडेलवाल, श्रेया खंडेलवाल, कल्पना खंडेलवाल, अनुजा जाधव, तारा भुतडा, डिंपली शर्मा, शिल्पा शिंगवी, राखी कोठारी आदी उपस्थित होत्या. सेवाप्रीतच्या महिला सदस्यांचा किशोर घावटे, कृष्णा सुद्रिक, संदीप घोलप यांनी सत्कार केला. विनायक दरंदले यांनी आभार मानले.