अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पदभार स्विकारला असता, त्यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, महिला सचिव ॲड. अनिता दिघे, लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन ॲड. भूषण बऱ्हाटे, संचालक ॲड. संदीप काळे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. चंदन बारटक्के, ॲड. रवींद्र शितोळे, ॲड. संजय पाटील, ॲड. बी.आर. म्हस्के आदी उपस्थित होते.
उपस्थित वकीलांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन, वकील संघाच्या वतीने सहकार्याची भावना व्यक्त केली. प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी कौटुंबिक न्यायालय वकील संघाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कावरे यांनी केले. आभार शिवाजी सांगळे यांनी मानले.