14 वर्ष वयोगटात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट व आर्मी पब्लिक स्कूलचे संघ विजयी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार सामने होत आहे. 12, 14 व 16 वर्ष वयोगटातील खेळाडूंचे संघ उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत असून, अटीतटीचे सामने होत आहे.
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी (19 सप्टेंबर) 14 वर्ष वयोगटात झालेल्या फुटबॉल सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट व आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला.

सकाळच्या सत्रात 14 वर्ष वयोगटातील मुलांचे सामने झाले. यामध्ये ऊर्जा गुरुकुल विरुध्द सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट यांच्यात सामना अटीतटीचा झाला. यामध्ये सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघाकडून माहिर गुंदेचा याने 1 गोल करुन प्रतिस्पर्धी संघावर 0-1 ने विजय मिळवला.
तर आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तब्बल 7 गोल केले. या सामन्यात प्रियदर्शनी पब्लिक स्कूलला प्रतिस्पर्धी संघावर एकही गोल करता आला नाही. आर्मी पब्लिक स्कूल कडून विरेंद्र व तन्मय याने प्रत्येकी दोन, सार्थक, प्रतिक व संकेत याने प्रत्येकी एक गोल करुन 7-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने एकतर्फी विजय मिळवला. स्पर्धेचे पंच म्हणून सलमान शेख, प्रियंका आवारे, सोनिया दोसानी, अभिषेक सोनवणे, ऋतिक छजलाणी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्सचे सदस्य परिश्रम घेत आहे.
